हलगर्जीपणाचा कळस! 899 लोकांना ‘एक्सपायर’ झालेल्या लसीचे डोस टोचले

न्यूयॉर्क। एकीएकडे जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या टाइम्स स्क्वेअरमधील लसीकरण केंद्रात जवळपास 899 लोकांना एक्सपायर झालेल्या लसीचे डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी माहिती दिली. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक प्रश्न पडले आहेत.

न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाने म्हटले आहे की, 5 ते 10 जून दरम्यान टाइम्स स्क्वेअरमधील एनएफएल एक्सपिरियन्स बिल्डिंगमध्ये फायझर लसीचे डोस घेणाऱ्या 899 लोकांनी लवकरात लवकर फायझरचा आणखी एक डोस घेतला पाहिजे.

घडलेल्या संपूर्ण प्रकरणानंतर “एक्सपायर झालेल्या लसी घेतलेल्या लोकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल शहरातील कंत्राटी लस कंपनी एटीसी लसीकरण सर्व्हिसेजने दिलगीर व्यक्त केली आहे.

मात्र अद्यापही नागरिकांच्या मनात एक्सपायर झालेली लस घेतल्यामुळे आरोग्यास काही हानी पोहचणार नाही याची चिंता लागून राहिली आहे.

मात्र कंत्राटी लस कंपनी एटीसी लसीकरण सर्व्हिसेजने दिलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे की, ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत अमेरिकेतील कोरोना ;रुग्णांची आकडेवारी पाहता 3 कोटी 43 लाख 43 हजारांहून अधिक कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सध्या 51 लाख 66 हजारांहून अधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे अमेरीतवरील कोरोनाच सावट अद्यापही टळलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! WTC फायनलसाठी भारतीय संघाची यादी जाहीर; केएल राहूलसह या मोठ्या खेळाडूंना संधी नाही
अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विक्की जैनसाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली, तु जगातला बेस्ट…
पावसाचा बीडकरांना मोठा फटका; तब्बल 15 हजार क्विंटल साखल भिजली; कोट्यावधींचे नुकसान
वॅक्सीन घेतल्यानंतर ताप आला तर नेमकं काय समजायचं? जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.