पंगा गर्लची हुशारी! कंगनाने ‘या’ दिग्दर्शकाला चित्रपटातून काढले बाहेर, म्हणाली…

मुंबई। बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या पंगा गर्ल म्हणून ओळखली जाते. ती सध्या तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. गेले वर्षभर कंगनाने अनेक राजकीय घडामोडींवर वादग्रस्त विधानं केली आहेत. व त्यामुळे ती कायम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

अशातच कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. कंगनानं इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आधी या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन साई कबीर करणार होता. परंतु आता कंगनानं त्याला चित्रपटातून बाहेर काढत स्वत:च दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे.

स्वत:च दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारल असतानाच एक दावा देखील केला आहे. ती म्हणाली की,“मी पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात उतरते आहे. जवळपास 1 वर्ष मी आणीबाणीवर अभ्यास करतेय. त्यामुळं माझ्याशिवाय इतर दुसरा कोणीही आणीबाणीवर चित्रपट तयार करु शकेल असं मला वाटत नाही.

रितेश शाह सध्या पटकथेवर काम करत आहेत. या चित्रपटासाठी मला इतर कामांचं बलिदान द्याव लागलं तरी देखील माझी तयारी आहे.” अशा आशयाची पोस्ट कंगनानं केली आहे. ट्विटरवर तिचं अकाउंट बंद केल्यामुळं सध्या ती कू या अॅपवर पोस्ट करत आहे.

कंगनावर जरी अनेकजण टीका करत असले तरी, कंगनाच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील भूमिका पाहता तीचे अनेक चाहते आहेत. तिने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कंगनाचे अनेक चित्रपट पाहण्यास चाहते कायम उत्सुक असतात.

अशातच सध्या तिच्या ‘थलाईवी’ या चित्रपटाची चाहते उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी सांगितले त्यांचे सलमान, ऐश्वर्यासोबतचे नाते, म्हणाले, सलमान आणि एश्वर्या..
शिल्पाने १० कोटींच्या जाहिरातीवर सोडले पाणी, ‘ती’ जाहिरात नाकारल्याने सोशल मीडियावर होतंय कौतुक…
लग्नाच्या ९ दिवसानंतर सासरी आलेली मुलगी झाली गायब, नंतर प्रियकरासोबत भेटली ‘या’ अवस्थेत
हा साबण आहे का स्टील आहे का दगड? वाचा हे काय आहे आणि लोक याला का विकत घेत आहेत?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.