चिनी लष्करच सरकारविरोधात सशस्त्र बंड करण्याच्या तयारीत; लडाखचा परिणाम

भारत आणि चिनी सैनिकांमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीनचे ४० जवान शहीद झाले. ही माहिती चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सैनिकांपासून लपवली.

या कारणामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीचे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांमध्ये नाराजगी वाढत आहे. ते कोणत्याही क्षणी सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या ओपिनियनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि चीनच्या सिटीझन पॉवर इनिशिएटिव्हचे अध्यक्ष जियानली यांग यांनी हा खुलासा केला आहे.

“गेल्या अनेक वर्षांपासून पीएलए चीनच्या सत्तेतील मुख्य भाग म्हणून राहिलेला आहे. जर देशसेवेत कार्यरत असणाऱ्या पीएलए केडरच्या भावना दुखावल्या गेल्या तर सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये ते सामील होऊन सरकारविरोधात बंडखोरी करतील” असं यांग यांनी म्हटलं आहे.

जर आपले अधिक सैनिक ठार झाले आहेत हे जर सरकारने मान्य केले तर तर देशात अशांतता पसरेल आणि सीपीपीच्या सत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो. असं वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यांग यांनी म्हटलं आहे.

चीनचे किती सैनिक मारले गेले असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी आपल्याला याची कसलीही माहिती नाही असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांचा हवाला दिला. यात चीनचे ४० सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात आले होते.

परंतु त्यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. एक आठवडा झाला तरी चीनने आपले किती सैनिक ठार झाले हे सांगितले नाही. तर दुसरीकडे भारताने सैनिकांची माहिती देऊन त्यांना सन्मानही दिला.

चीनच्या या वागण्यामुळे पीएलएच्या अनेक माजी सैनिकांना राग आला आहे. हा राग दिवसेंदिवस वाढत चालला आहे असेही यांग यांनी लिहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.