Share

“महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देतो, तरीही सापत्नेची वागणूक; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली

आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड विषयासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) इंधन कर कमी करण्यावरून ठाकरे सरकारला सुनावले होते. राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.(The Chief Minister gave the statistics to pm modi)

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देतो. पण केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जाते”, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “पहिल्यांदा जीएसटीचे पैसे द्या. महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव कमी करा”, अशा रोकठोक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३७.३ टक्के इतका आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर गोळा होतो. एकूण जीएसटीपैकी महाराष्ट्रातून १५ टक्के जीएसटी गोळा केला जातो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास कर देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.”

“तरी देखील महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीच्या थकबाकीची रक्कम मिळत नाही. आज देखील केंद्राकडे महाराष्ट्राची सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे”,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात होणाऱ्या आपत्तींना देखील केंद्राकडून योग्य मदत मिळत नाही, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारने कोविड काळात सामन्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. वेगवेगळ्या योजना आणल्या. राज्यातील नागरिकांना आर्थिक मदत केली. कोविड काळात शिवभोजन थाळी मोफत देण्यात आली. महाराष्ट्राने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडली आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या करांबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज मुंबईमध्ये एक लिटर डिझेलच्या दरामध्ये केंद्र सरकारचा २४ रुपये ३८ पैसे इतका वाटा आहे. तर राज्य सरकारचा २२ रुपये ३७ पैसे इतका वाटा आहे. राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे ही वस्तुस्थिती नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘पहिल्यांदा जीएसटीचे पैसे द्या, महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव कमी करा’; ठाकरेंचा मोदींवर पलटवार
कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्बने स्वत:ला उडवणाऱ्या ‘या’ महिलेचे शिक्षण ऐकल्यावर व्हाल अवाक
संजय दत्त ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला सेक्सी; अजय, सलमान, अक्षयबाबतही केलं मोठं वक्तव्य

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now