इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस मजबूत, शिक्षा होऊ शकते – सरकारी वकील

 

अहमदनगर। प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबाबत काल संगमनेर न्यायालयात पहिली सुनावणी झाली. यानुसार त्यांना आता पुढील तारीख सात आॅगस्ट ही देण्यात आली आहे.

या वेळी त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर त्यांना या वेळी वकिलामार्फत जामीन घ्यावा लागेल. पूत्रप्राप्तीबाबत इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते.

त्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संगमेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी झाली. सरकारतर्फे अॅड. लीना चव्हाण यांनी बाजू मांडली.

इंदुरीकरांनी अद्याप आपला वकील दिलेला नाही. काल केवळ समन्स बजाविण्याचे काम न्यायालयात झाले. या कार्यवाहीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाल्या की, “अतिशय बळकट असा हा खटला आहे.

इंदुरीकर महाराजांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे विधान सोशल मिडियातून संपूर्ण राज्याने ऐकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. या खटल्याची पुढची तारीख सात आॅगस्ट ठेवण्यात आली आहे.

त्यासाठी त्यांना स्वतः न्यायालयात यावे लागेल. वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करावा लागेल. न्यायालयाचा हा निर्णय अमान्य असल्यास त्यांना वरच्या न्यायालयात जाऊन खटला थांबविण्यासाठी अर्ज करावा लागेल”.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.