Share

पादचारी वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पंधरा फूट उडून भीषण अपघात; 2 जण जागीच ठार…

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारचा ताबा सुटला आणि कार उलटली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने आसपासच्या परिसरात काही वेळ खळबळजनक वातावरण झालं होतं.

हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात जागीच ठार झालेले लोक चव्हाण कुटुंबातील असून, सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज या गावचे आहेत. ते बीडमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने जात होते.

कारमध्ये एकूण सहा जण होते. तेव्हा विठ्ठलवाडीजवळ पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील वारकरी भरधाव कारच्या आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी कारचालकाने कार रस्त्यावरील ढिगाऱ्यावर घातली. भरधाव कार ढिगाऱ्यावरून पंधरा फूट उडून पुढे रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.

माहितीनुसार, काल पहाटे मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील सहाजण कारमधून बीडमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. कार क्र.के. ए.२३ एन ७०७४  आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ पोहोचताच एक वारकरी रस्ता ओलांडत होता. अचानक समोर आलेल्या वारकऱ्याला वाचवण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला.

कारमध्ये चव्हाण कुटुंब होते. सहा जण बीड च्या दिशेने जात होते. मात्र, कारचा अपघात झाला आणि कार उलटली. त्यामुळे कार मधील दोघे जागीच ठार झाले. पृथ्वीराज चव्हाण व प्रियांका चव्हाण असे जागीच ठार झालेल्यांची नावं आहेत. यात कारमधील बाकी चार आणि एक वारकरी असे पाच जण जखमी झाले आहेत.

अपघाताबद्दल माहिती समजताच, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे काही वेळ आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं.

इतर

Join WhatsApp

Join Now