Share

Uttar Pradesh : नवरदेवाने स्टेजवरच घेतले नवरीचे चुंबन; नवरी मुलीने भर मंडपातून नवरदेवासकट वऱ्हाडींनाही हाकलले

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात लग्नादरम्यान वधूचे चुंबन घेणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले. वधूने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या कृत्यामुळे नवरदेवावर कारवाई करावी, असे सांगितले. अहवालानुसार, 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सामूहिक विवाह कार्यक्रमांतर्गत संभलच्या पावस गावात एक विवाह झाला.

नवरदेव बदाऊन जिल्ह्यातील बिलसी भागातील तर वधू पावस येथील होती. या लग्नानंतर 28 नोव्हेंबरला स्थानिक रितीरिवाजानुसार दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात पुष्पाहार घालण्याचा कार्यक्रमही होता. रिपोर्टनुसार, पुष्पाहार कार्यक्रम होत असताना नवरदेवाने वधूचे चुंबन घेतले.

नवरीला हे आवडले नाही आणि ती तिथून उठून तिच्या खोलीत गेली. नंतर घरच्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. मुलीने पुन्हा स्टेजवर जाण्यास नकार दिला. ‘मला आता त्याच्यासोबत रहायचे नाही. मी फक्त माझ्या घरातच राहीन. मला त्यांचे वागणे आवडत नाही. 300 लोकांसमोर असे कृत्य करू शकणारी व्यक्ती कशी सुधरेल?

हे प्रकरण घरापुरते मर्यादित नव्हते. नववधूने जवळच्या बहजोई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. नंतर, वरानेही आपली बाजू मांडली आणि सांगितले की वधूने त्याच्याशी चुंबन घेण्याबाबत पैज लावली होती. वराने असा दावा केला की वधूने स्टेजवर तिचे चुंबन घेतल्यास त्याला 1500 रुपये मिळतील आणि जर तो तसे करू शकला नाही तर वधूला 3000 रुपये द्यावे लागतील अशी पैज लावली होती.

मात्र, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तोडगा निघाला. यामध्ये दोघे वेगळे राहायचे असे ठरले होते. स्टेशन प्रभारी पंकज लावनिया यांनी मीडियाला सांगितले की, सध्या दोघांचे लग्न नोंदणीकृत आहे, त्यामुळे त्यांना घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी लागेल.

महत्वाच्या बातम्या
Prachi Thakur : आधी बापाच्या व्यवसायाची लाज वाटायची पण आता मात्र अभिमान वाटतोय; मुलीच्या भावनिक पोस्टवर लोकांनी केला प्रेमाचा वर्षाव
बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, BCCI ने जाहीर केले 2 नवे संघ
Raj Thackeray : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच महाराष्ट्र जातीजातीत विभागला गेला’

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now