भारतामध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक शहरांमध्ये विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्न सोहळ्यातील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नववधू आणि नवरदेव एकमेकांची धुलाई करताना दिसत आहेत.(The bride and groom fight in wedding)
नवरदेव आणि नववधू लग्न सोहळ्यातील स्टेजवर उभे राहिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लग्न सोहळ्यातील विधी पार पडल्यानंतर नववधू नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी नवरदेवाचे लक्ष कॅमेऱ्याकडे असते. नववधू काही वेळ वाट पाहते. पण नवरदेव नववधूकडे बघत नाही. त्यामुळे नववधू संतापते.
रागात असलेली नववधू नवरदेवाच्या संपूर्ण चेहऱ्याला मिठाई लावते. यावर नवरदेव भडकतो आणि नववधूच्या कानाखाली मारतो. त्यामुळे नववधू आणखीनचं संतापते आणि नवरदेवाला बुक्क्यांनी मारू लागते. यामुळे नवरदेव आणि नववधूमध्ये जोरदार भांडण होतं. नवरदेव आणि नववधूचा भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/reel/Ccx5dtJPG8R/?utm_source=ig_embed&ig_rid=bec41cbb-67f6-4761-820b-19e5b2bf20b5
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. only sarcasm या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हंटले आहे की, “आजचं मारून टाकशील का?” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हंटले आहे की, “जोरदार भांडण चालू आहे.”
अनेकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. काही यूजर्सनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे देखील सांगितले आहे. हा व्हिडिओ खोटा आहे. नवरदेव आणि नववधू ऍक्टिंग करत आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे. लोकांनी या व्हिडिओची खिल्ली देखील उडवली आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडले अडचणीत; ‘या’ प्रकरणी हरीयाणा पोलीसांत तक्रार दाखल
अजब गजब लव्हस्टोरी! अखेर विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा व्हायरल
देशमुखांवर झालेले १०० कोटींचे आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर