राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. सांगलीतील इस्लामपूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी ब्राम्हण समाजविषयी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाने आज पुण्यात आंदोलन केलं आहे.(The Brahmins got angry after Mitkari’s statement)
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांना अडवले.
यामुळे राष्ट्रवादी आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. पण पोलिसांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान ब्राम्हण महासंघाचे गुरुजींच्या वेशात आलेले काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर शांतिपाठ करत होते.
यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथील भाषणात एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो होता. त्यावेळी कन्यादान होत होतं. मी म्हंटल अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्यादान करण्याचा विषय असतो का? ”
“नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामि. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको सानी समर्पयामि म्हणजे घेऊन जा. अर्रारा… कधी सुधारणार “, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भाषणात म्हणाले होते.
असे वक्तव्य करून अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची खिल्ली उडवली आहे, असा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. तसेच या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मशिदींसमोरील हनुमान चालिसेला विरोध करणाऱ्या पोलीस आयुक्त पांडेना पदावरून हटवले
बार्शीतील जवानाला वीरमरण; शेवटच्या क्षणी मुलाला म्हणाले होते, बाळा रडू नको मी खाऊ घेऊन येतो…
लग्न होताच रणबीर-आलिया पोहचले जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य