Share

Satara : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण

Satara

Satara : राज्यात सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा प्रचंड वाढली आहे. नागरिक कोणालाही मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे अनेक निरपराधांना लोकांचा मार खावा लागत आहे. आता अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.

एक प्रियकर बुरखा घालुन आपल्या प्रेयसीला भेटायला गेला असता त्याच्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे त्याला गावातील नागरिकांबरोबरच पोलिसांचाही मार खावा लागला आहे. त्याची ही आयडिया त्याच्यावर चांगलीच उलटली असल्याचे बोलले जात आहे.

सातारा येथील तामजाईनगरमध्ये एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. त्याने एका दुकानदाराला एका शाळेचे नाव विचारले. मात्र, त्या दुकानदाराला त्या व्यक्तीचा संशय आल्याने त्याने त्याला पकडले. त्यानंतर बुरखा परिधान केलेली व्यक्ती ही स्त्री नसून पुरुष असल्याचे त्याला कळले.

हा व्यक्ती मुलं पळवण्यासाठी आला असल्याचा संशय आला व नागरीकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनतर त्याचे भांडे फुटले.

आपण आपल्या प्रेयसीला भेटायला आलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यात विशेष म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी हे दोघेही विवाहित आहेत. हे सगळं ऐकून पोलिसांनादेखील धक्का बसला. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणे प्रियकराला चांगलेच महागात पडले असल्याचे बोलले जात आहे.

याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. सांगली जिल्ह्यात साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही एका तृतीयपंथीयाला मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण केली. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे व यातून ते निष्पाप लोकांना मारहाण करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर 
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण 
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now