Share

खेळ खल्लास! मुलगा ड्रग्ससाठी मागायचा पैसै, वडिलांनी इलेक्ट्रिक करवतीने तुकडे करून दिले फेकून

murder

गुजरातमधील अहमदाबादमध्ये डोके, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेच्या ५ दिवसांनंतर २२ जुलै रोजी शहरातील एलिसब्रिज परिसरात कापलेले पाय सापडले. आता पोलिसांनी या प्रकरणाचे पडदे उघडले आहेत. हा मृतदेह जोशी नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा असून तो आपल्या वडिलांसोबत अहमदाबादच्या वासणा परिसरात राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांची हत्या त्यांचे वृद्ध वडील नीलेश जोशी यांनीच केली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाच दिवसांनी वासणामध्ये हे कापलेले पाय आढळून आल्यावर एलिसेब्रिज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कूटरवरून जाणारा एक वृद्ध पॉलीथीन फेकताना दिसला ज्यामध्ये कापलेले पाय दिसले.

पोलिसांनी स्कूटरचा नंबर काढला. पोलीस जेव्हा स्कूटर मालकापर्यंत पोहोचले तेव्हा समजले की त्याने ही स्कूटर अंबावाडी परिसरातील एका वृद्धाला विकली होती. स्कूटर मालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस स्कूटर वापरणाऱ्याच्या घरी पोहोचले. अधिकारी पुढे म्हणाले,

“तेथे शेजाऱ्यांकडून कळले की स्कूटर वापरणारा ६५ वर्षीय निलेश जोशी आहे, जो द्वितीय श्रेणीतील निवृत्त अधिकारी आहे. ते त्यांचा एकुलता एक मुलगा स्वयम जोशी यांच्यासोबत येथे राहतात. खूप दिवसांपासून स्वयमबद्दल काहीच माहिती नाही हेही कळलं. नीलेशच्या घरातून धारदार चाकू आणि रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर नीलेशला ताब्यात घेण्यात आले.

खुनाचा आरोपी नीलेश जोशी याने पोलिसांना सांगितले की, गेल्या ५-६ वर्षांपासून त्याचा मुलगा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, त्या दिवशीही तो दारू पिऊन पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी घरात ठेवलेल्या दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी नीलेश अहमदाबादच्या कालुपूर मार्केटमध्ये गेला, तिथून (इलेक्ट्रिक सॉ) त्याने ग्राइंडर मशीन आणले. त्यांनी ग्राइंडरच्या सहाय्याने मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर हा कचरा काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

अहमदाबाद क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीलेश जोशी आपल्या मुलाच्या हत्येनंतर सुरतला गेला होता. अवध एक्सप्रेसने सुरतहून गोरखपूरला जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यादरम्यान त्याला अटक करण्यात आली. गोरखपूरहून नेपाळला पळून जायचे असल्याचे आरोपीने सांगितले.

महत्वाच्या बातम्या
आमदार लांडगेंचा ‘आखाड’! २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२३० किलो मासे, १३ हजार अंडी; ७० हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था
‘ज्या आईने राजकारणात जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद,’ उद्धव ठाकरे कडाडले
शेजारच्या वहिनीसाठी पास्ता घेऊन जायचो आणि तिच्यासोबत.., प्रसिद्ध अभिनेत्याचा गौप्यस्फोट

इतर क्राईम ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now