बेजबाबदारीचा कळस! आईने मांजरीसाठी दुधात टाकलं विष, अन् दूध मुलानेच घेतलं पिऊन

झारखंड | घरातील वयाने मोठ्या कळत्या माणसांनी केलेली चूक कशी अंगलट येऊ शकते याच उत्तम उदाहरण समोर आले आहे. समोर आलेल्या घटनेमुळे झारखंडमधील मेढना गावात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. त्याठिकणी एका महिलेनं मांजरीला जिवे मारण्यासाठी दुधात विषारी औषध टाकलं मात्र ते तिच्या मुलानेच प्यायलं आहे.

घडले असे की, एक मांजर घरात येत नेहमी त्रास देते. घरातील दुधासह आहाराच्या अनेक गोष्टी खाते. या मांजरीकडून होणाऱ्या नुकसानाला कंटाळून मांजरीला मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उंदराला मारण्यासाठी वापरले जाणारे औषध दुधात मिसळले.

दरम्यान, या महिलेने मांजरासाठी ठेवलेले दूध मांजराने न पिता मांजराऐवजी बाहेरून आलेल्या तिच्या मुलानेच पिऊन घेतले. त्यामुळे या मुलाची प्रकृती बिघाडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत.

महिलेने सांगितल्याप्रमाणे तिला मुलगा दूध पिऊ शकतो ही कल्पना नव्हती. दूध पिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली होती, मात्र उपचारानंतर डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे तो आता धोक्यातून बाहेर आला आहे.

ही घटना समजल्यानंतर गावातील लोक हैराण झाले आहेत. या घटनेतून अनेकांनी शिकायला पाहिजे. निष्काळजीपणामुळे कुटुंब संकटात येऊ शकते. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुक्या प्राण्याला पाव खायला घालणे वृध्दाच्या आले अंगलट, वनविभागाने बजावली नोटीस
गावच्या पोलिस पाटलावर हात उचलणे पडणार महागात, होणार ‘ही’ मोठी कारवाई
जणू काही सेहवागच फलंदाजी करत होता असं वाटलं; माजी क्रिकेटपटूने केले पंतचे कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.