चीनच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा शेतकऱ्यांसाठी लावलाय; राज ठाकरेंचा केंद्रसरकारवर हल्लाबोल

मुंबई | कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टिका केली आहे. चीनच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा शेतकऱ्यांसाठी लावलाय. असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे चुकीचे नाहीत तर त्यातील त्रुटी चुकीच्या आहेत. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी, कृषी मंत्र्यांशी चर्चा करून त्या दुर करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेना-भाजपचं नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती तेव्हाचं औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाले पाहिजे होते.

वाढीव वीज बिलाविरोधात सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती. लोकांनी सरकारला वाढीव वीज बिलाविरोधात जाब विचारायला पाहिजे. सरकार वीजकंपन्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

रिहाना कोण कुठली बाई इतक्या दिवसात तुम्हांला तरी माहित होती का, आणि तिला बोलायला केंद्र सरकार भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना ट्विट करायला लावतं ही चुकीची गोष्ट आहे. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
म्हत्वाच्या बातम्या-
संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटा आक्रमक
राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.