कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला झाला आनंद; म्हणाली…

नवी दिल्ली | बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. गेल्या काही दिवसांपासून बेजबाबदारपणे ट्विट करण्याचा कंगणाने सपाटाच लावला होता.

पश्चिम बंगालच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर कंगणाने बंगालमधील जनतेबद्दल आणि तृणमुल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह विधानं ट्विट केली होती.

कंगणाच्या  ट्विटला अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर ट्विटरकडून कंगणा राणावतचे ट्विटर हॅंडलवर सस्पेंडची कारवाई करण्यात आली होती. कंगणाच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर बॉलिवूडधील कलाकार, सोशल मिडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मिडियावर कंगणाचे भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

अशातच बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिध्द मॉडेल कुब्रा सैत चांगलीच आनंदीत झाली आहे. कंगणाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर कुब्रा सैतने ट्विट केलं आहे. कुब्रा म्हणाली, कंगणा राणावत नसली तरी सोशल मिडिया चांगलं चालू शकतं.

मी कधी तिला भेटले असते तर माझ्या डाव्या पायाने मारण्याच्या स्थितीमध्ये होते. परंतू ही पध्दत चांगली आहे. मी आशा करते की तिच्या शिवाय सोशल मिडिया चांगले होऊ शकते. असं कुब्रा सैत म्हणाली आहे.

कुब्रा सैतने नेटफ्लिक्सची ओरिजनल  सीरीज सिक्रेड गेम्समध्ये ट्रांसजेंटरची भूमिका निभावली आहे. रेडी, सुलतान या चित्रपटातून कुब्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कंगणा राणावत आणि कुब्रा सैतमध्ये सोशल मिडियावर याआधी  शाब्दिक युध्द रंगलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
बेसिनचा एक पाईप बसवण्यासाठी प्लंबरने मागितले तब्बल ४ लाख रुपये; वाचा संपुर्ण किस्सा
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सख्या भावासोबत केला होता फिल्मी पडद्यावर रोमान्स; लोकांनी दिल्या शिव्या
पंगा क्वीन कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड; वादग्रस्त विधान केल्याने ट्विटरची कारवाई

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.