शिवसेनेला खिंडार पाडायला निघालेल्या भाजपलाच पडले मोठे भगदाड; एकनाथ शिंदेंनी साधला मौका

डोंबवली हा भाजपचा गड मानला जातो. गेल्या महानगर पालिका निवडणूकीत भाजपचे ४३ नगरसेवक निवडणून आले होते. यावर्षी भाजपच्या गडाला खिंड पाडण्याच्या तयारीत शिवसेना आहे. ठाणे जिल्हाचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल होण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समोर येत आहे.

भाजपचे काही विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून येत आहे. माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनिता पाटील, सायली पाटील त्यांचबरोबर परिवहन समिती सदस्य संजय राणे, खोणी ग्रामपंचायत सदस्य हनुमान ठोंबरे यांचा समावेश असल्यांची माहीती समोर येत आहे.

कल्याण- डोंबवलीच्या गेल्या महानगर पालिका निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेची ताकद मोठी होती. मागील महानगर पालिका निवडणूकीत शिवसेनेचे ५२ आणि भाजपचे ४३ नगरसेवक होते. मनसेला ९, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेला २ एमआयएमला १ जागा मिळाल्या होत्या, १० जागावर अपक्ष निवडूण आले होते.

येणाऱ्या महानगर पालिका निवडणूका डोंळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना कल्यांण _डोंबवली महानगर पालिकेत भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेना प्रयत्नंशील आहे. यासाठी ठाणे जिल्हाचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्वःता मैदानात उतरले आहेत.

आता कल्याण- डोंबवलीच्या महानगर पालिकेची मुदत संपत असुन तेथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. सध्या कोरोणाची लाट औसरली असून, यामुळे महाराष्ट्रातील अनेक महानगर पालिकेच्या निवडणूका येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे आता कल्याण- डोंबवलीच्या महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना कंबर कसून मोर्चे बांधणीच्या तयारीत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणूकीत युतीला पुर्ण बहुमत मिळूनही राज्यात शिवसेनेने वेगळी भूमीका घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता स्थापण केली. यामुळे भाजपने अनेक शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी आणि शक्तीस्थानं ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली आहे. मात्र कल्याण- डोंबवली मध्ये भाजपच्या व्यूहरचनेला शिवसेनेने सुरुंग लावला आहे.

महत्तवाच्या बातम्याःबांग्लादेशने केला पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव, पाकीस्तान वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची शक्यता

पुढील एक महिना संप चालूच राहणार? आता पुढील सुनावणी २० डिसेंबरला; वाचा कोर्टात काय घडले..
आनंद गिरीने गुरू नरेंद्र गिरींना फोनवर दिली होती धमकी, तुमचा ‘तो’ व्हिडिओ जर लोकांना दाखवला तर…
राजनाथसिंहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकीस्तान पिसाळला; म्हणाला भारताच्या आक्रमकतेला चोख उत्तर देणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.