..आणि लाईव्ह चर्चासत्रात विरोधी पक्षातील नेत्याने भाजप नेत्याला चपलेने चोपले, पाहा व्हिडीओ

मुंबई | विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये अनेकवेळा शाब्दिक युध्द होताना दिसून येतं. विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर नेहमी टिका करत असतात. यामध्ये नेत्यांना मारहाणीच्याही घटना घडलेल्या आहेत. वृत्तवाहिन्यांच्या चॅनेलवर पक्षातील नेत्यांमध्ये चर्चासत्र सुरू असते त्यामध्ये पक्षाचे नेते आपली भूमिका मांडत असतात.

एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात भाजपच्या नेत्याला चपलेने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आंध्रप्रदेश भाजपचे सरचिटणीस विष्णूवर्धन रेड्डी आणि अमरावती परिक्षणा समिती संयुक्त कृती समितीचे सदस्य श्रीनिवास राव चर्चासत्रामध्ये बोलत होते. आपआपली भूमिका मांडत असताना दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला.

 

 

श्रीनिवास राव यांचा तेलगू देसम पक्षाशी संबंध असल्याचा आरोप विष्णूवर्धन रेड्डी यांनी केला. त्यानंतर राव यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी पायातील चप्पल काढली आणि रेड्डी यांना मारली. राव यांनी मारलेली चप्पल रेड्डी यांच्या तोंडाला लागली आहे.

आंध्रप्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू विराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी या घटनेचा कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकारामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेने पोलिसांच्या नाकावर टिच्चून जामीन मिळवला
महिलेसोबत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांनी कर्मचाऱ्याला दिला चोप
‘हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडीयम बनवून त्याला स्वताचे नाव दिले होते’
‘तसले’ सिनेमे करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या हिरोवर काय दिवस आलेत बघा

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.