लोकांना घरी राहायला सांगता मग तुम्ही का निवडणूका घेता; भाजपच्या नेत्याने मोदींना सुनावले

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्णयांची घोषणा करत आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात लस, बेड, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. उपचार वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचा जीव गमावावे लागत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्र रूप धारण केले आहे.

देशातील परिस्थीतीवरून  सरकारवर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षही मोदी सरकारवर टीका करत आहे. मात्र लाईव्ह चर्चासत्राच्या शोमध्ये एका भाजप प्रवक्त्या महिलेने थेट मोदी सरकारविरोधातचं संताप व्यक्त केला आहे.

भाजप प्रवक्त्या रितू रावत यांनी ऑक्सिजन, औषधाच्या देशातील परिस्थीतीवरून सरकारवरचं हल्लाबोल केला. मला भाजप प्रवक्ता पदावरून पक्षाने काढले तरी चालेल. पण मी लोकांचा त्रास पाहू शकत नाही. असं रावत यांनी म्हटलं आहे.

आयएएस अधिकारी सुर्यप्रताप सिंग यांनी ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. भारत समाचार या हिंदी भाषेतील बातम्यांच्या चॅनेलवर लाईव्ह चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये आप, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सर्वजण आपआपले मत मांडत होते.

भाजप प्रवक्त्या रितू रावत म्हणाल्या, ‘सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा असं तुम्ही सांगत होता. मग निवडणूका का घेतल्या? तुम्हीच हे पाळलं नाही. गंगास्नान करायला का दिलं? ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जात आहे’.

‘या धरतीवर माणसंच नाही राहीली तर निवडणूकीचा काय फायदा? सरकार बनलं जाईल, निवडणूका होतील पण त्यासाठी एक वेळ द्या. मला भाजप प्रवक्ते पदावरून काढलं तरी चालेल. पण लोकं मरतायेत मला याचा त्रास होतो.’ असं रितू रावत यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओ शेअर करत  आएएस अधिकारी सुर्यप्रताप सिंग यांनी रितू रावत यांचे कौतूक केले आहे. भाजपच्या नेत्याने देशात सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधातच रोष व्यक्त केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या-
“जर तुम्हाला या गोष्टीची लाज वाटत नसेल तर आम्हालाच समाजाचा एक भाग असल्याची लाज वाटते”
मोदी सरकारला उच्च न्यायालयाने झाप झाप झापले, भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या
मोदी सरकारला उच्च न्यायालयाने झाप झाप झापले, भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.