भाजपने आणि माध्यमांनी माझी थट्टा केली, मात्र ‘माझा तो इशारा खरा ठरला’ – राहुल गांधी

दिल्ली । जगभरात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदावस्थेत आहे.

सेवा क्षेत्रासह उद्योग संकटात आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारला लक्ष केले आहे.

आर्थिक संकट येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत.

मोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत, बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वी आर्थिक त्सुनामी येणार असे म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थितीविषयी इशारा दिला होता.

भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती, असे ट्वीट राहुल गांधींनी केले आहे. यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.