नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा हल्ला: जवानांच्या मृतदेहांचा सडा पाहून काळीज पिळवटून जाईल

मुंबई : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत २० जवान शहीद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे २० जवान शहीद झाल्याची माहिती आहे.

बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकी दरम्यान सुरक्षा बलाचं मोठं नुकसान झाले. काल ५ जवान शहीद झाले होते तर  १२ जखमी झाले होते आणि २१ जवान बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली होती.

मात्र आता धक्कादायक माहिती पुढे येत असून चकमकीत 20 जवान शहीद झाले आहेत तर अजून काही बेपत्ता आहेत. तर घटनास्थळी अजून ही जवानांचे मृतदेह पडून असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा’

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याची गरज नाही; भाजपचा आरोग्यमंत्री बरळला

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले आहेत महेश भट्ट?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.