‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती घर सोडून गेल्यावर होणार मोठा धमाका

मुंबई। सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये नवनवीन व चटकदार ट्विस्ट येत आहेत. अशातच आता मालिकेला नवीन वळणं येत आहेत. मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. गेले कित्येक महिने अनिरुद्ध व अरुंधती यांचा घटस्फोट प्रकरण मालिकेमध्ये सुरु आहे.

त्यामुळे आता या घटस्फोटाला कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अरुंधती घर सोडून जाण्याच्या तयारीत आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अरुंधती पुन्हा एकदा आपलं घर सोडून जाताना दिसत आहे. इतकचं नव्हे तर जाताना अरुंधती असंही म्हणते की, हे मी कधीही परत न येण्यासाठी जात आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनाची धडधड वाढली आहे.

तर अरुंधती घर सोडून जात असल्यामुळे तिची मुलं यश, इशा व अभिषेक रडून व्याकुळ झाले आहेत. सोबतच सासू-सासरे सुद्धा प्रचंड दुखी झाले आहेत. व घरातील इतर मंडळी देखील रडत आहे. तर दुसरीकडे अनिरुद्धची गर्लफ्रेंड संजना अरुंधती घर सोडून जाते व घटस्फोट होतोय म्हणून खुश आहे. त्यामुळे आता आता लवकरच अरुंधती घर सोडून जाणार असल्याने ती आता कुठे जाणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

मिळालेल्या माहितीनुसार घर सोडून गेल्यावर अरुंधती पुढे जाऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच गायन क्षेत्रात मोठे नाव कमावणार असल्याचे सांगितले जाते. अरुंधती एक मोठी गायिका बनणार आणि खूप मोठी प्रसिद्धी मिळवणार असे भाकीत या पात्राबद्दल व्यक्त केले जात आहे.

त्यामुळे आता अरुंधती गेल्यावर तिचं कुटुंब व संजना सर्व गोष्टी कशा सावरणार व अरुंधती नेमकं काय करणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मालिकेत आलेल्या या नव्या ट्वीस्टमुळे चाहते खुपचं अस्वस्थ आहेत. सोबतच अरुंधती आपल्या अस्तित्वासाठी आत्ता नेमकं काय करणार हे पाहण्यासाठी उत्सुकदेखील आहेत.

अशातच‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एंट्री घेतली आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी चाहते आणखी उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
..तर तुला भारतात पायही ठेऊ देणार नाही; बीसीसीआयची बड्या क्रिकेटपटूला थेट धमकी
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी करणार लग्न? ‘असा’ हवा आहे मुलगा
“नरेंद्र मोदी मला थांबून म्हणतात, कैसे हो भाई, यालाच म्हणतात सत्ता, पॉवर”
झी मराठीवरील या मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्यांच्याजागी सुरू होणार या नवीन मालिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.