‘मोठी बातमी; भारतीय जवानांना फेसबुक, टिक टॉक सह ८९ अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश’

 

नवी दिल्ली | देशात काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशाच्या सुक्षिततेसाठी ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती.

आता देशाच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कराने मोठा निर्णय घेतला असून भारतीय लष्कराने जवानांना फेसबुक, टिक टॉक, ट्रुकॉलर आणि इन्स्टाग्रामसारखे अ‍ॅप डिलीट करण्यास सांगितले आहे.

भारतीय लष्कराने असे ८९ अ‍ॅपची यादी जाहीर केली असून हे अ‍ॅप्स जवानांना त्यांच्या फोनमधून डिलीट करावे लागणार आहे.

भारतीय लष्कराची कुठलीही महत्वाची माहिती लिक होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेल्या आहे.

या अ‍ॅपमध्ये टिक टॉक, फेसबुकच नाही, तर Likee, युसी ब्राऊसर, पबजी सारखे प्रसिद्ध अ‍ॅपचाही यात समावेश आहे.

दरम्यान, भारत-चीन सीमावादाचा प्रश्न चिघळत असल्याने आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी केंद्राने भारतात चीनच्या ५९ अ‍ॅपवर घातली आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.