इंडियन आयडलकडून प्रेक्षकांची मोठी फसवणूक, गरीब सायली कांबळेबाबत झाला ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुंबई | इंडियन आयडल १२ हा रिअलिटी शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोमध्ये अनेक गरीब स्पर्धकांना कला सादर करण्याची संधी दिल्याचे शोमध्ये दाखवण्यात येते. असे प्रकार इंडियन आयडलमध्ये घडल्यानंतर ते कलाकार खरोखरचं गरीब आहेत का? की हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट आहे असा प्रश्न विचारला जात आहे.

त्याचं झालं असं की, इंडियन आयडलचा १२ वा सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये सायली कांबळे नावाची स्पर्धक आहे. शोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे सायली अत्यंत गरीब घरातून आली आहे. तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

याशिवाय अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत झालेल्या भागात सायलीने तिच्या घरी टिव्ही नसल्याचे सांगितले आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने इंडियन आयडलच्या मंचापर्यंत झेप घेतली असं चित्र उभं करण्यात आले. ही स्पर्धा जिंकणे हेच सायलीचे ध्येय असल्याचा दावा शोच्या निर्मात्यांकडून करण्यात आला.

अशात सायलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धक्कादायक खुलासा झाला आहे. व्हिडीओमध्ये सायली चक्क प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेजवर गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून निर्मात्यांनी मांडलेली स्टोरी उघडी पडली आहे.

हा व्हिडीओ पाहून ती खरचं इतकी गरीब आहे का? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. हा सर्व प्रकार टीआरपीसाठी करण्यात येत असल्याचे सांगून नेटकऱ्यांनी निर्मात्यांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! ट्विंकल खन्नामूळे अजय देवगनने वाजवली होती करिश्मा कपूरच्या कानाखाली
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता
आशियातील सर्वात दुर्दैवी देश! जिथे मुलांना जगण्यासाठी विकावी लागताहेत स्वत:ची खेळणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.