भिकाऱ्याचं आभाळा एवढं मन; कोरोना रिलीफ फंडात केले ९० हजार दान

 

चेन्नई | देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहे.

आता अशीच एक बातमी तामिळनाडूच्या मदुराईमधून समोर आली आहे. एका भिकाऱ्याने आपले मोठे मन दाखवत राज्याच्या कोरोना रिलीफ फंडमध्ये ९० हजार रुपयांची मदत केली आहे.

लोकांकडून मागून खाणाऱ्या पूल पांडियन याने कोरोना राज्य मदतनिधीमध्ये ९० हजार रुपये देऊन एक उदाहरण उभे केले आहे. याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे.

जिल्हा प्रशासनाने यांना सामाजिक कार्यकर्त्याची पदवी दिली आहे. यामुळे मला खूप आनंद झाला आहे. याआधीही मी मे महिन्यात जिल्हाधिकारी टी. जी. विनय यांना गरीब मुलांसाठी १० हजार रुपयांची देणगी दिली होती, असे पूल पांडियन यांनी म्हटले आहे.

पूल पांडियन हे खूप गरीब आहे. ते तामिळनाडूच्या मदूराई येथील रहिवासी आहे. लोकांकडे मागून ते आपले जीवन जगत असतात, मात्र आपल्या बचतीतून त्यांनी कोरोनाच्या संकटात मोठी मदत केली आहे.

दरम्यान, गरिबीमुळे पूल पांडियन यांनी भीक मागण्यास सुरुवात केली. तसेच भीक मागून आलेले पैसे वाचवून ते शासकीय शाळांना ही देणगी देतात, याआधीही त्यांनी अनेकदा शाळांना देणगी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.