Share

सुंदर बायकोने नवऱ्याच्या बाॅसलाच जाळ्यात अडकवत उकळले लाखो रूपये; पण अति झाल्यावर मात्र…

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या सौंदर्याचा फायदा घेऊन एका व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि शारीरिक संबंध बनवताना व्हिडिओ बनवला. त्यानंतर महिलेने व्हिडीओ दाखवून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.(The beautiful wife collect lakhs of rupees by trapping her husband’s boss)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव रेखा कंवर असे आहे. आरोपी महिला तिच्या पतीसोबत एका झोपडीत राहत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आरोपी महिलेला महागड्या वस्तू विकत घायच्या होत्या. आलिशान घरात राहायचे होते. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला या गोष्टी करता येत नव्हत्या.

आरोपी महिलेचा नवरा एका मार्बल कंपनीत स्टोन कटरचे काम करत होता. आरोपी महिला दिसायला सुंदर होती. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आरोपी महिलेने मार्बल कंपनीच्या मालकाला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर आरोपी महिलेने कंपनीच्या मालकाशी शारीरिक संबंध ठेवले. एके दिवशी आरोपी महिलेने शारीरिक संबंध बनवतानाचा एक व्हिडिओ शूट केला.

या कटात आरोपी महिलेने तिचा मित्र शैतान सिंगची मदत घेतली. त्यानंतर आरोपी महिलेने पैशांची मागणी करत मार्बल कंपनीच्या मालकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास हा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. सुरवातीला कंपनीच्या मालकाने आरोपी महिलेला २३ लाख रुपये दिले.

कंपनीच्या मालकाकडून मिळालेल्या पैशातून आरोपी महिलेने आलिशान घर बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर देखील आरोपी महिला मार्बल कंपनीच्या मालकाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होती. यावेळी आरोपी महिलेने तिचा मित्र शैतान सिंगमार्फत मार्बल कंपनीच्या मालकाकडे ५० लाखांची मागणी केली होती.

यामुळे मार्बल कंपनीचा मालक फार त्रस्त झाला होता. त्यानंतर कोणालाही न सांगता मार्बल कंपनीचा मालक घरातून निघून गेला होता. त्याच्या कुटूंबियांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान मार्बल कंपनीचा मालकाने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
योगींनी उत्तर प्रदेशात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवले, ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर आणली मर्यादा
अभिनेता विजय बाबूवर महिलेने केला बलात्काराचा आरोप; गुंगीच्या गोळ्या देऊन…
ठाकरेंनी सुरुवात केली अन् अन्य राज्यांनीही मोदींवर सुरु केला टीकेचा भडीमार, पहा काय घडलं…

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now