राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहताना पहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकींमूळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते यात लक्ष घालून आहेत. त्यात उमेदवारसुद्धा विजयी होण्यासाठी आपली ताकद आजमावताना दिसत आहेत. मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील ग्रामपंचायत निवडणुक लढवणाऱ्या गीताबाई मनोहर रहाटे यांना ऑटोरिक्षा चिन्ह मिळाले होते. त्यांच्या मुलाने आईला विजयी करण्यासाठी आणि मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी चक्क खरा ऑटोरिक्षा घरावर नेवून उभा केला.
ऑटोरिक्षा छतावर नेवून ठेवण्यासाठी गीताबाई यांच्या मूलाने क्रेनचा वापर केला आहे. या ऑटोरिक्षावर त्याने विद्यूत रोषणाई केली आहे. रोज रात्री त्यांच्या घरासमोर नागरिक ऑटोरिक्षा पाहण्यासाठी गर्दी करत असतात.
दरम्यान, उमेदवाराने कितीही अनोखे फंडे वापरले तरीही त्यांच्या पदरात यश पडतेच असे नाही. गीताबाई यांच्या मुलाने वापरलेला फंडा पाहून त्या निवडणूक जिंकतात की पराभुत होतात हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे. मात्र या भन्नाट कल्पनेची चर्चा गावागावातील कट्ट्यांवर होत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
धक्कादायक! कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू…
उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला फटकारले; खुलासा करण्याचे दिले आदेश
भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका; ‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’
निष्पाप बालकांची ही ह.त्या, याला महाराष्ट्र सरकार जबाबदार; भाजपचा आरोप