Share

Navratri : नवरात्रीच्या पहील्या दिवशी ‘या’ पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी..

Navaratri

Navratri : गणेशोत्सवानंतर लगेचच एकामागे एक नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची सुरुवात होते. त्यात नवरात्री म्हटलं की अतिशय उत्साहाचा सण. गणपतीनंतर नवरात्री हा ९ दिवसांचा सण घरोघरी अतिशय आनंदात साजरा केला जातो.

लगेचच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २६ तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना केली जाते. ही घटस्थापना कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर करावी?, याबाबदल सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात.

नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते, तर शेवट नऊ कन्यांच्या पूजनाने होत असते. घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या, पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान इत्यादी साहित्य वापरले जाते.

दिनांक २६ सप्टेंबर रोजी म्हणजेच येत्या सोमवारी पहाटे ४.३० वाजतापासून तर सकाळी ८ वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल. याशिवाय सकाळी १० ते ११.३० पर्यंतही घटस्थापन करता येईल. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधून पुढील नऊ दिवस आनंदात नवरात्री साजरी करण्यात येऊ शकते.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कुठलेच सण, उत्सव आनंदाने साजरे करता आले नाही. मात्र, यावर्षी राज्य सरकारने सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वांनी नवरात्र, दसरा, दिवाळीची जोरात तयारी सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Pune : नवरात्री दरम्यान पुण्यात होतोय तीन दिवसांचा ‘सेक्स तंत्र’ कोर्स; काय आहे नेमका प्रकार? वाचा…
नवरात्रीदरम्यान मटणाची दुकानं बंद…’; सोनू निगमने केले आणखी एक वादग्रस्त विधान
भोंगावादावर गृहमंत्री वळसे पाटील स्पष्टच बोलले; भजनं, किर्तनं, नवरात्री, गणेशोत्सव, यात्रा सगळंच…
“नवरात्रीत, गणेशोत्सवात, भीम जयंतीत डीजे लागतात, तेव्हा मुस्लिमांना त्रास होतो, पण ते तक्रार करत नाही”

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now