Jharkhand : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. दरम्यान, विद्यार्थ्यांचं काही चुकलं तर त्याला शिक्षादेखील करत असतात. आपला विद्यार्थी हुशार बनावा, त्याने सगळं ज्ञान प्राप्त करावं, त्याला वाईट गोष्टींची सवय लागू नये, या उद्देशाने शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत असतात.
मात्र, आता याउलट विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी परीक्षेमध्ये कमी गुण दिल्याने नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारहाण केली आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
झारखंडमधील दुमका येथील एका गावामध्ये ही घटना घडली आहे. शिक्षकाने प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण योग्य प्रकारे दिले नाही, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधले. त्यांनतर ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी शिक्षकाला मारहाणसुद्धा केली.
ही घटना एका निवासी शाळेतील आहे. या शाळेतील नवव्या वर्गातील एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांना D ग्रेड देण्यात आली होती. म्हणजेच हे विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळे शिक्षकांनी प्रात्यक्षिकांचे योग्य गुण दिले नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव कुमार सुमन असे आहे. त्यांनी एएनआयला सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आम्हाला बैठक करण्यासाठी बोलावलं होत. त्यांचे निकाल चुकीचे लावण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. परंतु, अंतिम निकालामध्ये प्रात्यक्षिकांचे गुण सामाविष्टच न झाल्याने हा प्रकार घडला आहे. ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असल्याने आम्ही त्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलू शकलो नाही,” असे ते म्हणाले.
तसेच यासंदर्भात तेथील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शिक्षकांसोबत चर्चा केली. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर प्रात्यक्षिकांमध्ये कमी गुण देण्यात आले असल्याचे विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले. तसेच शिक्षकांकडूनही याची योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती,” असे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र हेब्राम यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
VIDEO: शुभमन गिल सारासोबत गेला डिनर डेटला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळेच झाले हैराण
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट
Kamal Rashid Khan: नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केआरके आहे करोडोंचा मालक, मुंबई ते दुबई आहेत अनेक आलिशान घरे