एअरलाईन (Airline) :तुम्हालाही स्वस्तात परदेशात जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरलाइन्स तुम्हाला एक उत्तम ऑफर देत आहेत. याअंतर्गत तुम्ही फक्त ९ रुपयांमध्ये विमानाने प्रवास करू शकता. या अंतर्गत तुम्ही भारत आणि वियतनाम दरम्यान फक्त ९ रुपयांमध्ये प्रवास करू शकता.
इंटरनॅशनल एअरलाइन कंपनी वियतजेट ९ रुपयांच्या हवाई तिकिटांची ऑफर आणली आहे, ज्याचे बुकिंग ४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. तुम्हाला सांगतो की, ही ऑफर २६ ऑगस्टपर्यंत आहे. पण याअंतर्गत तुम्ही जर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक केले तरच तुम्हाला ही संधी मिळेल.
विमान कंपनी VietJetने दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की VietJet भारत ते वियतनाम प्रवासासाठी ३०,००० प्रमोशनल तिकिटे देत आहे. या तिकिटांच्या किमती ९ रु.पासून सुरू होतात. ऑफर अंतर्गत, १५ ऑगस्ट २०२२ ते २६ मार्च २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान करता येईल.
एअरलाइन कंपनीच्या म्हणण्यानुसार, ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंग केल्यास प्रमोशनल तिकीट मिळू शकते. व्हिएतजेट या विमान कंपनीचे व्यावसायिक संचालक जय एल लिंगेश्वर यांनी माहिती दिली आहे की, ‘व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान १७ मार्गांसाठी थेट उड्डाणे चालवणार आहे.
पण यानंतरही, एअरलाइन्स भारताचे मुख्य गंतव्य दक्षिणपूर्व आशिया (बाली, बँकॉक, सिंगापूर, क्वालालंपूर), ईशान्य आशिया (सोल, बुसान, टोकियो, ओसाका, तैपेई) आणि आशिया पॅसिफिकशी जोडण्याचा विचार करत आहेत. ते म्हणाले, “पाच प्रमुख भारतीय शहरांतील प्रवासी आता दा नांग या सुंदर शहराला भेट देऊ शकतात आणि त्यानंतर होई एन, ह्यू इम्पीरियल, माय सोन अभयारण्य आणि जगातील सर्वात मोठी गुहा सोन डूंग यासह जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.
थेट उड्डाण करू शकतात. त्याचवेळी व्हिएतनामचे राजदूत फाम सॅन चाऊ म्हणाले की, व्हिएतनाम हे भारतीय पर्यटकांमध्ये एक मजबूत पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यासाठी आता दूतावासात जाण्याची गरज नाही. कंपनीने सांगितले की, सध्या मोठ्या संख्येने व्हिएतनामला जाण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Boycott: लाल सिंग चड्ढानंतर रक्षाबंधनवर बहिष्कार टाकण्याचे होतेय मागणी, ‘या’ कारणामुळे हिंदू एकवटले
Eknath Shinde : संतोष बांगर शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत का थांबले होते? ; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
भाजप नेत्याने पंख्याला लटकवून घेत घेतला गळफास; प्रकरण वाचून हादरून जाल