भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार खेसारी लाल यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या खेसारी(Khesari Lal) नेपाळची टॅटू गर्ल म्हणून प्रसिद्ध सौम्या पोखरेलसोबत आगामी म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शूटिंग सेटशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(the-actress-started-crying-as-soon-as-khesarilal-hugged-her)
ज्यामध्ये सौम्या ढसाढसा रडत आहे आणि खेसारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. हा म्युझिक व्हिडिओ खूपच इमोशनल असल्याचं समजतंय. वास्तविक, दोघांचा हा व्हिडिओ खेसारीलाल यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सौम्या पिवळी साडी आणि खुल्या केसांमध्ये दिसत आहे, तर खेसारी सूट-बूटमध्ये दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CcmBSRSjJoI/?utm_source=ig_web_copy_link
खेसारी लाल यांच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. यावर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. दोघे एका म्युझिक व्हिडीओचे शूटिंग करत असून ते एक दुःखद गाणे आहे. सौम्या अचानक रडायला लागते आणि त्यानंतर खेसारी तिची काळजी घेत आहे, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
खेसारी त्यांना समजावून सांगतात की अश्याच परफॉर्मेंसची गरज आहे. आता हेच करायचे आहे. बोलताना असं रडावं लागतं आणि कॅमेऱ्यासमोर आपल वेडेपण पूर्णपणे दाखवावं लागत. प्रत्येकाला तुमची पालगपंती इथेच पहायची असते. आता तुम्ही करत असलेल्या खऱ्या शूटिंगमध्येही तुम्हाला तुमचा सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा आहे.
ते वास्तविक देखील खूप छान दिसले पाहिजे. खेसरीने समजावून सांगितल्यानंतर सौम्या रडणे थांबते आणि संपूर्ण परिस्थिती सामान्य होते. फॅन पेजवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते- तुझे चाहते तुम्हांला असेच नाही एवढे प्रेम देत भावा. तुम्ही सगळ्यांना प्रामाणिकपणे साथ देता आणि हेच तुमच्या उत्कृष्ट स्टारडमचे कारण आहे.
भावनिक गाण्यांसाठीही तू खूप मेहनत घेतली आहेस. भाऊ आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. खेसारी लाल यादव यांची गणना भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप स्टार्समध्ये केली जाते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसोबतच तो अनेक हिट म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसला आहे.