अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; “अभिनेत्यासोबत रात्र घालवण्याची ठेवली होती ऑफर”

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवा नाही. चित्रपटात काम देण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते, कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या मागण्या करत असतात. आता पर्यंत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहे.

आता असाच एक खुलासा बॉलिवूड अभिनेत्री किश्वर मर्चंटने केला आहे. किश्वरने हम तुम, शबाना, भेजा फ्राय २ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  एक मुलाखतीत बोलताना किश्वरने बॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. किश्वर म्हणाली, माझ्यासोबत हे एकदाच झालं होतं.

मी माझ्या आईला घेऊन एका ठिकाणी मिटिंगला गेले होते. मला मिटिंगमध्ये सांगितलं की चित्रपटात काम करायचं असेल तर अभिनेत्यासोबत रात्र घालवावी लागेल. मी ऑफर धुडकावली आणि निघून गेले. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे प्रकार घडत असतात.

किश्वर मर्चंंट पुढे म्हणाली, अभिनेत्याचं आणि निर्मात्याचं मोठं नाव आहे. मी आता त्या दोघांचं नाव घेणार नाही. यामुळे तुम्ही चित्रपटात काम करत नाही का? असा सवाल किश्वरला विचारल्यावर ती म्हणाली,  कामाकडे माझा जास्त फोकस आहे.

मी टीव्ही क्षेत्राकडे माझा मोर्चा वळवला. टीव्ही विश्वामध्ये आपल्याला जास्त लोकं ओळखायला लागतात. चित्रपटात छोटे रोल मिळाल्याने असं होत नाही. मला टीव्ही क्षेत्रात काम मिळत गेले. आज मी माझ्या करियरकडे पाहून खुश आहे.

अभिनेत्री किश्वरने हिंदी मालिकांमध्ये शोमध्ये काम केले आहेत. तसेच काही चित्रपटांमध्येही भूमिका निभावल्या आहेत. सोशल मिडियावर किश्वर नेहमी सक्रीय असते. बिग बॉस सीजन ९ मध्ये किश्वर मर्चंट आणि तिचा पती पती सुयश राय पाहायला मिळाले होते.

किश्वर मर्चंट आणि सुयश राय २०१६ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. एका टीव्ही शोमध्ये दोघांची ओळख झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. किश्वर सुयश पेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे. तरीह दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-
भारताला घाबरला पाकीस्तान! आता भारताच्या ‘या’ गोष्टीमुळे पाकीस्तानला भरली धडकी
‘सुंदरा मनामध्ये भरली’, मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात? पहा फोटो
माधूरी दिक्षितच्या नावाने प्रसिद्ध आहे भारतातील ‘हे’ ठिकाण कारण…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.