ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ

मुंबई | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशात लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या राधे चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची उत्सूकता सलमानच्या चाहत्यांना लागली होती. चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहेत. येत्या १३ मे दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटातील टीम वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करत असते. लोकांमध्ये जाऊन, रिअॅलिटी शोमध्ये जाऊन, सोशल मिडियाद्वारे चित्रपटाचं प्रमोशन करत असतात. आता सलमानच्या राधे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंत चक्क पीपीई किट घालून रस्त्यावर उतरली आहे.

पीपीई किट घालून राखीने पुर्णपणे स्वत:ला सुरक्षित केले आहे. रस्त्यावरील लोकांना ती सलमान खानचा राधे चित्रपट बघण्याचं आवाहन करत आहे. तसेच मास्क लावा, काळजी घ्या असं सांगत आहे. यावेळी तिने भाजी खरेदीचाही आनंद लुटला आहे.

राखी म्हणते, मास्क घाला, पीपीई कीट घाला, घरी राहा सुरक्षित राहा. हॉस्पीटलमध्ये जाताना मास्क, पीपीई कीट घालून जावा. देवापेक्षा मोठा कुणीही नाही. देवाकडे प्रार्थना करा की आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेव. सलमान खानचा राधे चित्रपट नक्की बघा. लोकांनी पीपीई किट वाटले पाहिजे. मी सुध्दा सर्वांना पीपीई किट वाटणार आहे. असं राखी सावंत म्हणाली.

पुढे राखीने भाजी खरेदीचा आनंद लुटला. भाजी खरेदी करताना ती भाजीवाल्यासोबत भाव कमी करतान दिसत आहे. माझ्याकडून भाजीचे जास्त पैसे घ्यायचे नाहीत. असं ती म्हणतं आहे. तसेच ती भाजी घेताना इतरांना भाजी खरेदी करायला या असंही सांगत आहे.

रस्त्यावर फिरत असताना राखीने पोलिसांची भीतीही व्यक्त केली आहे. ती म्हणते माझ्यामूळे गर्दी होत आहे. पोलिसांनी मला पाहिले तर मला लाठीने मारतील असं राखीने म्हटलं आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

सलमान खान आणि सोहेल खानने केली होती राखी सावंतच्या आईची मदत

काही दिवसांपूर्वी राखी सावंतच्या आईचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते . त्यांच्या शरीरातून एक मोठी गाठ काढली गेली. राखीच्या आईच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी उचलला होता. यानंतर राखीने सलमान खानचे रडत रडत आभार मानले होते.

राखी म्हणाली,  सलमान खानने आम्हाला जगातील सर्वात मोठे कर्करोग डॉक्टर डॉ. संजय शर्मा दिले होते. डॉक्टरांनी माझ्या आईला बरे केले. माझे संपूर्ण आयुष्य सलमान भाई आणि सोहेल भाईंनी घ्यावे, अशी मी प्रार्थना करते, असं तिने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
लोकांचा जीव वाचवायचाय, म्हणत शिवसेना आमदाराने रेमडेसिवीरसाठी तोडली ९० लाखांची एफडी
कांचनावाडीची टुटी-फ्रुटी थेट दुबईत; २३ वर्षीय ऋषीकेशची पुर्ण देशात चर्चा
जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्याचा दबाव वाढला; युएस चेंबर्सकडून भारताला लस देण्याची मागणी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.