‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अभिनेता मुलाच्या उपचारासाठी मागतोय मदत

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उपचाराअभावी रूग्णांना प्राण गमावावे लागत आहेत. देशात ऑक्सिजन, बेड, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना काळात अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खुप हाल झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामूळे अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत.

कोरोनामुळे चित्रपटांचे, मालिकांचे शुटींग बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. यामूळे या क्षेत्रात छोट्या मोठ्या भूमिका साकारून पोट भरणाऱ्या अभिनेत्यांसमोरही आर्थिक संकट उभे राहिले आहे. मराठमोळा अभिनेता अतुल विरकर यांच्यावर कोरोनामुळे काम मिळणे बंद झाल्याने दीड वर्षाच्या मुलाच्या उपचारासाठी लोकांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे.

अभिनेता अतुल विरकरने तु माझा सांगाती, तारक मेहता का उल्टा चष्मा,  लव्ह लग्न लोचा, माझ्या नवऱ्याची बायको यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका निभावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पण देशात कोरोनाची लाट आली आणि त्यांना काम मिळणे अवघड होऊन बसले.

अतुल विरकर यांचा दीड वर्षाचा मुलगा प्रियांश याला आलन हार्डून ड्युडली सिंड्रम्स या दुर्दम्य आजाराने ग्रासले आहे. त्यामूळे त्याला मान धरता येत नाही.  त्याच्या उपचारासाठी ऑक्शुपेशनल थेरपीची गरज आहे. त्यासाठी तब्बल १० लाख खर्च होणार आहे.

अभिनेता वरद विजय चव्हाण याने फेसबूक अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत अतुल विरकर यांच्या बाळाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. प्रियांश हा भारतातला पहिला मुलगा आहे ज्याला या आजाराने ग्रासले आहे. त्याच्या उपचाराचा ६ महिन्याचा खर्च ५० हजार रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या-
चाहता अभिनेत्रीला भेटायला गेला अन् डायरेक्ट किस करुनच आला; व्हिडिओ झाला व्हायरल
रिक्षा चालवणाऱ्या गरीब नॅशनल चॅम्पीयनचा खेळ बघून आनंद महिंद्रा झाले फिदा; दिली मोठी ऑफर
महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.