अरे हाड..आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेतल्या प्रत्येकाला; मराठमोळा अभिनेता राजकारण्यांवर संतापला

मुंबई | देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशातील परिस्थीतीवरून खेळाडूंनी, अभिनेत्यांनी, सर्वसामान्य नागरीकांनी सरकारवर टीका केली आहे. अनेकांनी लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.

अशातच मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे सरकारवर आणि राजकारण्यांवर चांगलाच संतापला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले की, प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे…कदाचित जीव गमावावू लागू शकतो…कारण…श्शु!! कुठे काही बोलायचं नाही…

अरे हाड…आम्ही प्रश्न विचारणार…सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला…उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…नागडे राजकारणी…नागडं सरकार.. असं म्हणत आस्ताद काळेने संताप व्यक्त केला आहे.

आस्ताद काळे हा मराठमोळा अभिनेता आहे. आजवर त्याने नाटके, चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. लग्न मुबारक, निर्दोष, निरोप, दमलेल्या बाबाची कहानी या चित्रपटांमध्ये आस्तादने काम केले आहे.

आस्ताद काळे हा मराठी बिग बॉस सीजन १ मध्ये सहभागी झाला होता. अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील १४ फेब्रूवारी दिवशी विवाह बंधनात अडकले आहेत. दोघेजण अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते.  दोघांनी कोर्ट मॅरेज पध्दतीने विवाह केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! सिरमने कोरोना लसीची किंमत केली कमी; वाचा काय आहे किंमत..
मी जगलो, यांची मुलं अनाथ होतील; ८५ वर्षीय RSS स्वयंसेवकाने बेडचा त्याग करत दुसऱ्या रुग्णाला दिले जीवनदान
“नरेंद्र मोदीच देशातले कोरोनाचे सुपर स्प्रेडर“; इंडीयन मेडीकल असोसिएशच्या उपाध्यक्षांनी सुनावले

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.