फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवुन आरोपीला कठोर शिक्षा देणार; उद्धव ठाकरेंचे आश्वासन

मुंबई। साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील घटनेमुळे खळबळ माजली आहे. या परिसरात ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली आहे.

दरम्यान पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं.

मात्र पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. व आता मुंबईत संतापाची लाट उसळी असून राजकीय नेतेमंडळी आता याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
महत्वाच्या बातम्या
विलासराव देशमुखांच्या नातवंडांचा ‘हा’ व्हिडिओ पाहिलात का? व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ
कोरोनामुळे भारताची जितकी अर्थव्यवस्था ढासळली आहे, त्यापेक्षा जास्त वेगाने ती सुधारतेय- नरेंद्र मोदी
17 महिन्यांच्या अयंशच्या आजाराबद्दल समजताच अमिताभ झाले भावुक, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी लगेच दिले पैसे 
ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांचा मुदतीआधीच तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.