नातीसाठी कायपण! ७४ वर्षांचे आजोबा नातीच्या शिक्षणासाठी दिवसरात्र चालवताहेत रिक्षा

मुंबई | जीवनात यश मिळवण्यासाठी खुप कष्ट करावे लागतात. अथक परिश्रम करून अनेकजण आपले स्वप्न पुर्ण करत असतात. पण मुंबईमध्ये एक आजोबा असे आहेत जे स्वत: साठी नाहीतर आपल्या नातीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.

गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवण्याचं काम करणारे देसराज जोद सिंग असं आजोबाचं नाव आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही ते न थकता परिस्थितीशी दोन हात करत दिवसरात्र मेहनत करतात. हे सर्व ते दहावीत शिकत असणाऱ्या त्यांच्या नातीसाठी करतात.

दहावीत शिकत असणारी त्यांची नात दिया ही अभ्यासात हूशार आहे. तिच्यासाठी आजोबा आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून सकाळी ६ वाजता रिक्षा घेऊन घराच्या बाहेर पडतात. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ते रिक्षा चालवून महिन्याला १५ हजार रूपये कमवतात. यातूनचं ते दियाच्या शिक्षणासाठी खर्च करतात.

मुळचे हिमाचल प्रदेशचे असणारे देसराज आजोबांना तीन मुले होती. त्यातील दोघांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले. तर एका मुलाने आईवडिलांशी कायमचे नाते तोडून टाकत तो पत्नीला घेऊन वेगळा राहू लागला. मुले सोडून गेली तरी आजोबा न डगमगता पत्नी, सुना, नातवांचा सांभाळ करत आहेत.

लॉकडाऊन काळात कोरोनाला घाबरून अनेकजण घरात बसले असताना हे आजोबा न घाबरता दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सेसला नेण्याचे आणण्याचे काम करत होते. पैसे जमवून ते कुटूंबीयांचे पालनपोषण करत आहेत. कठीण मेहनत घेत त्यांचं नातीला शिकवून सवरून मोठं करण्याचं जे स्वप्न आहे ते पुर्ण व्हावं हीच प्रार्थना.
महत्वाच्या बातम्या-
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल
तेरी मेरी यारी! विहिरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावली प्राणाची बाजी
पठ्ठ्याने चांगल्या नोकरीला मारली लाथ;  पेरूची शेती करून यशाला घातली गवसणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.