पाॅझीटीव्ह बातमी: ११ जणांच्या कुटुंबातील सर्वांना कोरोना; ‘अशी’ केली घरच्या घरी कोरोनावर मात

बिहार | कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करत आहे.

कोरोनामुळे कुणाच्या घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर कुणी आपल्या मुलाला गमावले आहे. तर कुणाच्या पुर्ण कुटूंबाला कोरोना लागण झाल्याने सर्वांनी जीव गमावले आहेत. कोरोनावर अनेकांनी मात देखील केली आहे. १०० वर्षीचे वृध्द देखील कोरोनाला हारवून घरी परतले आहेत.

अशाच एका कुटूंबाने कोरोनावर मात केली आहे. घरातील तब्बल ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. लहान मुलांपासून ते वृध्द व्यक्तींपर्यंत सर्वांना कोरोनाने घेरले होते. मात्र त्यांनी योग्य उपचार घेत कोरोनाला हारवले आहे.

पटनामधील अरवल जिल्ह्यात मोहन कुमार परिवारासह राहतात. अभियंता नगर मध्ये एका छोट्याशा घरात कुटूंबातील ११ सदस्यांसह राहतात. मुलांना चांगले संस्कार व्हावे, चांगले शिक्षण घेता यावे यासाठी मोहन कुमार दिवसरात्र मेहनत करतात.

एप्रील महिन्यामध्ये मोहन कुमार यांच्यासह त्यांच्या वयस्कर आईला आणि घरातील छोट्या मुलांना कोरोनाची लागण झाली. घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाल्याने कुमार यांचं कुटूंब घाबरून गेलं होतं. मोहन कुमार यांना घरातील सदस्यांना होत असलेला त्रास पाहावत नव्हता.

मोहन कुमार यांनी पहिल्यांदा स्वत:ला सावरले. त्यानंतर घरातील प्रत्येकाची काळजी घेण्यास सुरूवात केली. घरातील कर्ता व्यक्ती असल्याने त्यांना कुटूंबाची काळजी होती. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याची कोरोनाबद्दलची भीती कमी केली आणि मोठ्या आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली आहे.

मोहन कुमार यांची पत्नी रिंकी कुमारी, आई कृष्णा देवी, मुली मीरा आणि मनीषा, छोटा भाऊ अमिताभ कुमार, त्याची पत्नी जया कुमारी, त्यांची मुलं अमितेश आणि जिया या सर्वांनी घरीच आयसोलेशन होत केवळ सकारात्मक विचाराने कोरोनाला हारवले आहे.

दरम्यान देशात कोरोना रुग्णांचा अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत आहे. देशात आरोग्यव्यस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आजूनही कोरोनाला लोक घाबरत आहेत. अशावेळी एका घरातील ११ जणांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांचे कौतूक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोनू सूदने टेकले आरोग्य व्यवस्थेपुढे गुडघे;रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी त्यालाही बघावी लागली वाट
काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर
इंडियन आयडलमध्ये बापाविना दिसणार सायली कांबळे, तिने सांगीतलेले कारण ऐकून तुम्हालाही येईल रडू

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.