“अंबानीच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपनेच ते षडयंत्र रचलं”

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर राज्यात गोंधळ माजला आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला मनसुख हिरेन प्रकरणात धारेवर धरले आहे. या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. हिरेन प्रकरणात महाविकास आघाडी योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत.

“मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण ते वापरण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळत नाही. शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात लाखोंच नुकसान होत आहे. यामुळेच भाजप सुरक्षेचे कारण पुढे करत अंबानीना मदत करत आहे. भाजपनेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे”. असं नाना पटोले म्हणाले आहेत.

पुढे म्हणाले, “अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच वैयक्तिक सुरक्षा असतानाही ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी?” असा सवालही पटोले यांनी केला आहे.

दरम्यान राज्यातील महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा होऊ नये म्हणून भाजपने अधिवेशनात गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे. एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे, पण भाजपकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
नो पार्किंगला गाडी लावणे तरूणीला पडले महागात, पोलिस कर्मचाऱ्याने थेट कानाखालीच मारली
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत करणार, अजित पवारांची घोषणा
दोन दिवसापासून चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कोण आहेत माहिती आहे का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.