अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुने सोमवारपासून बेपत्ता होता. त्याच्या पत्नीने ‘माझ्या पतीने आत्म.हत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू जबाबदार असतील’ असा गंभीर आरोप केला होत. परंतु तो शेतकरी आता सापडला आहे.
विजय सुने हा शेतकरी सोमवारपासून बेपत्ता होता. त्याने आत्म.हत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहाली होती. या प्रकरणात त्याच्या पत्नीने ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांचे नाव घेतले होते.
यानंतर पोलिसांनी त्वरित त्यांच्या शोधार्थ ४ पथके पाठविली होती. अशातच ते शिरजगावकसबा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी दिसले. यानंतर त्यांची पोलीसांनी चौकशी केली. परंतु सूने यांनी नक्की का आत्म.हत्येची चिठ्ठी लिहिली याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी श्री. सुने यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले, की “मी शेतीप्रकरणाला घेऊन तणावात होतो. त्यामुळे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो”. या प्रकरणात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव आल्याने खळबळ उडाली होती.
“…म्हणून दोन टक्केवाला ब्राह्मण असूनही राजकारणात टिकलो”; फडणवीसांनी सांगितला राजकीय मंत्र
ड्रग्स कनेक्शन प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणूक आयोगाचा दणका! सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द