ठाण्यातील रुग्णालयात भीषण आग, चार रुग्णांचा मृत्यु; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना अनेकांचा मृत्यु होत आहे. अशात आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कामांमुळे अनेक धक्कादायक घटना राज्यात घडत आहे.

नाशिक, नागपुर, मुंबई इथल्या रुग्णालयातील खळबळजनक घटनांच्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील मुंब्राच्या येथे असलेल्या एका खाजगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागली आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

मुंब्रा येथे असलेल्या जुन्या मुंबई-पुणे रोडवर असलेल्या शिमला पार्क परिसरातील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात आग लागली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली आहे.

रुग्णालयात यावेळी २० रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये आयसीयु वार्डात ६ रुग्ण होते, तर इतर वार्डामध्ये १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती.

त्यानंतर आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांना तात्काळ बिलाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बाकीच्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ज्या रुग्णांची परिस्थिती चिंताजनक होती, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयातून बिलाल रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात नेत असतानाच त्या चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

दरम्यान, मुंब्रा कळवा मतदार संघाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. तसेच मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींना एक लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीयांनो आपण एकत्र येण्याची हीच ती वेळ; पाकीस्तानचा कर्णधार बाबर आझमचे मोठे वक्तव्य
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
भारत माझ दुसरं घर, तिथल्या लोकांना तडपताना नाही पाहू शकत; ब्रेट लीने केली ४१ लाखांची मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.