Share

उद्धव ठाकरेंविरोधात आता ठाण्यातील रिक्षावाले एकवटले, एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ झळकावले बॅनर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रिक्षावाला’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ‘काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेकच लागत नव्हता’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते.(Thane auto driver flashed banners support of Eknath Shinde)

‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद रंगला आहे. आता ठाण्यातील रिक्षाचालकांनी या वादात उडी घेतली आहे. ठाण्यातील शिंदे समर्थक रिक्षाचालकांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पोस्टर लावले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शिंदे समर्थक रिक्षाचालकांकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. ‘होय, आम्हाला अभिमान आहे..आमचा रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला’, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

तसेच सर्व रिक्षाचालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी ठाण्यात रॅली देखील काढणार आहेत. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. या रॅलीच्या संदर्भात माहिती देताना ठाण्याच्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढली जाणार आहे.”

“या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ठाण्यातील रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून या रॅलीला सुरवात होणार आहे”, असे विनायक सुर्वे यांनी सांगितले. यावेळी रिक्षाचालकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन देखील केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेला भलं मोठं भगदाड! अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; शिंदे गटाला दिला जाहीर पाठिंबा
शिवसेनेची गळती काय थांबेना, आता ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा, शिंदे गटात सामील होणार?
शिवसेनेने आढळराव पाटलांना दिली ‘या’ मतदारसंघातून लढण्याची ऑफर, पण पाटील म्हणाले, मला..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now