चीनमध्ये एका नवीन विषाणूचे थैमान; हजारो रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ

कोरोनानंतर आता जगावर आणखी एका रोगाचा धोका निर्माण झाला आहे. चीनमध्ये ब्रुसेलोसिस नावाचा रोग सध्या थैमान घालत आहे. चीनमध्ये या रोगाची अनेकांना बाधा झाली आहे. ब्रुसेला या विषाणूमुळे होणाऱ्या या रोगाचे हजारो रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

गांसु या प्रांतातील लँझू या शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या रोगाचे ३,२३५ रुग्ण आढळून आले आहेत. २४ जुलै २०१९ ते २० ऑगस्ट यादरम्यान एका औषधनिर्मिती करणाऱ्या एका कंपनीत लसनिर्मिती करण्याचे काम चालू होते. या प्रक्रियेत हा विषाणू पसरला आहे.

लसनिर्मिती करणारी कंपनी ही लँझू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ होती. प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला या विषाणूंचा वापर औषधनिर्मितीसाठी केला जात होता. ही प्रक्रिया सुरू असताना या कारखान्यातील धुराचे लोट कसलीच प्रक्रिया न करता कारखान्याच्या बाहेर सोडण्यात आले.

धुराच्या लोटातून ब्रुसेला नावाचा विषाणू बाहेर पडला. या विषाणूची बाधा परिसरात असलेल्या लोकांना झाली. हवेतून थेट सोडलेल्या गॅसमधून हा विषाणू हवेत पसरला. या गॅसमध्ये bacteria आणि प्रक्रिया करण्यात आलेली रसायने होती.

ब्रुसेलोसिस या आजारामध्ये डोकं दुखणे, ताव येणे, घशात खवखव होणे अशी लक्षणे आढळतात. या विषाणूच्या संसर्गामुळे मानवी प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. प्रजनन क्षमता नष्ट होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिमाण होतो. शेळ्यांच्या माध्यमातून पसरणाऱ्या या आजारला मेडिटेरियन फिव्हर असेही म्हटले जाते.

जर रुग्णाला वेळीच उपचार दिले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. योग्य उपचार दिल्यास रुग्ण बरा होतो. दीर्घकाळ उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो. संसर्ग झालेल्या प्राण्याला लस देणे, त्यांना मारून टाकणे यातुन संसर्ग रोखण्यात येतो. अशी माहिती uropean centre for disease prevention and control ने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?

डायरेक्टरने रात्री सोबत झोपण्याची ऑफर केल्यावर मराठमोळ्या श्रुती मराठेने काय उत्तर दिले पहा…

..त्यावेळी सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या; पण त्याच्या एका चुकीमूळे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.