Share

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी! आरक्षणासंदर्भात ठाकरे कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय

आज महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील(Mahavikas Aghadi Government) सर्व कॅबिनेट मंत्री हजर होते. या बैठकीत एसईबीसी उमेदवारांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.(thakre cabinate take big decison for maratha community)

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे काही उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. या उमेदवारांची निवड झाली होती. पण मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अशा एसईबीसी उमेदवारांकरिता एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यामुळे निवड झालेल्या एसईबीसी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात यावे, हा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे होणार आहे.

याशिवाय उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशीव असे करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक झालेले पाहायला मिळाले. “सरकारमधील इतर दोन्ही पक्षांनी या काळात चांगलं सहकार्य लाभलं. पण माझ्या स्वत:च्याच पक्षातल्या काही लोकांनी सहकार्य केलं नाही. तसेच तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आत्तापर्यंत चांगलं सरकार चालवलं”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीमधील सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. ज्या खात्यांचे विषय राहिलेले आहेत, ते पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अभिनेत्रीचे ट्रान्सपरंट लूकमधील बोल्ड फोटो पाहून चाहत्यांचे फिरले डोळे; सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा
उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा! राजीनामा देताना भावूक शब्दात म्हणाले…
फ्लोर टेस्टवेळी बहूमत नसल्यास राजीनामा द्यायचा की नाही? पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now