Politics: एकनाथ शिंदे यांनी बडोखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. तर शिवसेना नक्की कोणाची हा सर्वात मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा ठरला. त्याचवेळी अनेक उलथापालथी झाल्या. आता नाशिकमधून एक राजकीय बातमी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना त्यांच्याच मतदारसंघात पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे.
मालेगावमधील भाजपचे युवा नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश निश्चित झाला आहे. भाजप आणि शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण नाशिकच्या राजकारणात अनेक वर्षांपासून हिरे कुटुंबाला महत्त्वाचे स्थान आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अद्वय हिरे यांच्या प्रवेक्षाची तारीख कळवतील. त्यादिवशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह ते प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी हिरे यांचे बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गट आल्यापासून भाजप कार्यकर्त्यांना विशेष दर्जा मिळालेला नाही. भाजप कार्यकर्त्यांना सतत त्रास दिला जात होता. त्यामुळे कामगारांची बैठक झाली आणि त्यातून वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे अद्वय हिरे यांनी सांगितले.
सर्व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन शिवसेनेसोबत लढावं, अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही उद्वय हिर म्हणले. तसेच अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अनेक नेतेमंडळी देखील ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत असं बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोब कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
- रितेश देशमुखांचा राज्यातील बड्या नेत्याच्या मुलाला मेसेज; मागीतली ‘ही’ स्पेशल मदत