एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट शिंदेंचा आहे तर दुसरा गट ठाकरेंचा आहे. दोन्ही गट निवडणुकांमध्ये आपापली ताकद सिद्ध करताना दिसत आहे.
आता उद्धव ठाकरे यांनी लांजा तालुका खरेदी विक्रीच्या निवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यानंतर विजयी झालेल्या सभासदांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी राजन साळवी यांचे कौतुक सुद्धा केले आहे.
लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. ठाकरे गटाने ही निवडणूक शिव सहकार परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लढली होती.
राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे. त्यांनी १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
एकहाती सत्ता आल्यानंतर राजन साळवी सर्व विजयी उमेदवारांना घेऊन मातोश्रीवर गेले होते. तिथे जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी मातोश्रीवर ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हाप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश जुलूम, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भुवड हे नेते मातोश्रीवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
जिवंतपणी प्रेमविवाहाला विरोध, दोघांनीही जीव दिल्यावर घरच्यांनी थाटात लावलं लग्नं; म्हणाले, तो एक…
पाकिस्तानकडे आहे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा, एका झटक्यात बदलेल देशाचे नशीब
‘पठाण’ रिलीज होण्यापूर्वी शाहरुखने मन्नत बाहेर येत चाहत्यांची हात जोडून मागितली माफी? ‘हे’ आहे कारण