Share

Rajan Vichare : पाठींबा की नौटंकी? सरनाईकांच्या भूमिकेवर ठाकरे गटाच्या नेताचा संताप, म्हणाला, “त्यांना चपलेने मारलं पाहिजे.”

Rajan Vichare : मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुकारलेल्या मोर्चात आज सकाळपासूनच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजन विचारे (Rajan Vichare) हेही या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण चिघळलं.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मराठीविरोधी कथित भूमिकांवरून मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याच्या प्रत्युत्तरात मनसेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी पहाटेच अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना अटक करून पालघर (Palghar) येथील पोलिस ठाण्यात हलवलं. या कारवाईमुळे मोर्चाच्या आधीच वातावरण तापलेलं होतं.

यातच, वाढती गर्दी आणि कार्यकर्त्यांचा दबाव लक्षात घेता अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. त्यानंतर प्रताप सरनाईक (Pratap Sarnaiak) हेही मोर्चात दाखल झाले. त्यांनी मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सरनाईकांना तिथून माघार घ्यावी लागली.

“त्यांना चपलेने मारलं पाहिजे.”

यावर संतप्त प्रतिक्रिया देताना राजन विचारे (Rajan Vichare) यांनी सरनाईकांवर टीकास्त्र सोडलं. “पाठिंबा द्यायचा असेल, तर आधी राजीनामा द्या आणि मग या. तेव्हाच कार्यकर्ते तुम्हाला स्वीकारतील. अन्यथा अशा दुटप्पीपणासाठी त्यांना चपलेने मारलं पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. ही घडामोड केवळ मोर्च्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शिंदे गटातील मंत्र्यांवर मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर येत आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now