गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहे. नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह आणि नाव दिले आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवले आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षे त्यांना निवडणूक लढता येणार नसल्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी घेतला आहे. त्यामुळे ठाकरेंसमोर आता एक नवी अडचण उभी राहिली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील हे संचालक होते. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ज्ञानेश्वर पाटील हे विजयी सुद्धा झाले होते.
२१ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या निवडणूकीत ज्ञानेश्वर पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांनी निवडणूकीत दिलेल्या माहितीनुसार अपत्य कमी दाखवल्याचे समोर आले. त्यासंबंधी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह सौ सिंधू यांच्या बरोबर झाला होता. त्यानंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. पहिल्या लग्नापासून पाटील यांना एक अपत्य झाले होते. ते ७ मार्च १९९३ रोजी झाले होते. तर दुसरे अपत्य १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाले होते. त्यानंतर त्यांनी उषा यांच्यासोबत लग्न केले होते.
उषा यांच्यापासून त्यांना पहिले अपत्य १५ सप्टेंबर २००६ रोजी झाले आणि दुसरे अपत्य १५ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. या चारही अपत्यांची नोंदणी बार्शी नगर परिषदेमध्ये करण्यात आली होती. त्यांनी निवडणूकीत दिलेल्या माहितीमध्ये २००१ नंतरच्या त्यांच्या अपत्यांची माहिती दिली नव्हती. त्यामुळे आता त्यांना पुढील पाच वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या कणेरी मठातील लोकोत्सवात ५४ गायींचा तडफडून मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर
एका बाईने राणेंना पाडलं म्हणताच नितेश राणे संतापले, थेट अजितदादांची दुखरी नसच दाबली; म्हणाले..
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची जबरदस्त खेळी; ‘या’ मुद्द्यावर शिंदेंना चारही बाजूंनी घेरलं, वकीलांचीही बोलती बंद