कोरोना लढाईत ठाकरे सरकारची धडाकेबाज कामगिरी; आता आणले ‘हे’ नवीन टेक्नीक

मुंबई | कोरोना महामारीने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महाराष्ट्रात दिसून आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उच्च पातळीचे प्रयत्न करत आहेत.

मात्र, तरीही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन यंत्रणा आणली आहे.

राज्यात आता कोरोना टेस्टिंगसाठी ठाकरे सरकार एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामुळे कोरोना चाचणीच्या तपासांना वेग येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे केवळ आवाजाच्या सहाय्याने कोरोना तपासणी होणार आहे.

राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने नवनवीन पाऊले उचलताना दिसत आहे. यामध्येच आता आवाजाच्या मदतीने कोरोनाची तपासणी होणे, हे देखील एक वेगळे पाऊल आहे.

यासंदर्भातील माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. RT-PCR टेस्टिंगदेखील होत राहील, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.