Share

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देणार

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. या राजकीय संकटादरम्यान ठाकरे सरकारने(Thakrey Governemnt) काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.(Thackeray government’s big announcement, will give Rs 50,000 subsidy to farmers)

ठाकरे सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे नियमित कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त ठाकरे सरकारने राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे देखील मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री उपस्थित होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोविडच्या स्थितीसंदर्भात चर्चा झाली असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे.

काल शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सुरतला गेले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ माझे जिवाभावाचे मित्र आहेत.आज सकाळीच माझं एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. आमची तासभर चर्चा झाली आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. यादरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली, ‘या’ अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार
ठाकरेंना सोडून आमदार शिंदेंसोबत का गेले? शिवसेना आमदाराने सांगितलं खरं कारण
ईडीची धास्ती! आमदारांच्या बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत; भाजप सोबत जाण्याची करतायेत मागणी

ताज्या बातम्या राजकारण राज्य शेती

Join WhatsApp

Join Now