मोठा निर्णय! ठाकरे सरकार राज्यातील नागरीकांना देणार मोफत लस

मुंबई | कोरोनाने गेल्या  वर्षभरापासून थैमान घातले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात लस, बेड, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनावरील लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर नागरीकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

देशात सध्या कोरोनावरील कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड लस मिळत आहेत. देशातच लस बनत असल्याने नागरीकांनी या लस बनवणाऱ्या कंपन्यांचे  कौतूक केले आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती.

देशात लसीकरणाचा तीसरा टप्पा १ मे पासून सुरू होत आहे. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांना लस देण्यात येणार आहे. आता राज्यातील ठाकरे सरकारने लसीकरणाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवाब मलिक म्हणाले, ‘केंद्र सरकारने १ मे पासून देशात १८ वर्षांवरील लोकांना  लसीकरणाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ च्या खालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे’.

‘कोविशील्ड लस केंद्राला १५० रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयांना मिळणार आहे. कोव्हॅक्सीनची किंमत सुध्दा राज्यांना ६०० आणि खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये जाहीर करण्यात आली आहे’.

ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. सरकार आपल्या  तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे’.

‘मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली.  यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला. याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही होकार दिला होता’. असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब  मलिक म्हणाले.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर  १ कोटी ६९ लाख कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या २४  तासात देशात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २,७६७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सेल्समनचं एकाच वेळी तब्बल ३५ महिलांसोबत होतं लफडं; अन् त्यानंतर जे घडलं…
ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ
‘मोदींनी देशाची तर वाट लावली, पण जनतेलाही मरण्यासाठी सोडून दिले आहे; अभिनेत्याची जहरी टिका
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी पदाधिकारीच आरोपी

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.