बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या घटनेबाबत सर्वच स्तरातून गंभीर प्रतिक्रिया येत आहे.

त्यामुळे या प्रकरणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राजगृहावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी ही मागणी केली आणि ती मागणी तातडीने मंजूर झाली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

राजगृहावर तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.